सोलापुर : माढा लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रूपाने भाजपला हादरे बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्टिव मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अकलुजमध्ये सलग तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. परंतु त्या सभेच्या आधीच अकलुजमध्ये कॉंग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. मोहिते पाटील कुटुंबातील डॉ धवलसिंह प्रतापसिंह पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
देवेंद्र फडणवीस उद्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेणार आहेत. डॉ.धवलसिंह कॉंग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष होते. मात्र फडणवीसांच्या खेळीने अकलुजमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात दुसरे मोहिते पाटील भाजप बाजून मैदानात उतरणार आहेत. धवलसिंह हे माजी सहकार मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असून त्यांचा अकलुज परिसरात मोठा गट आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का आहे.
आज त्याठिकाणी कोणाचाही प्रवेश नाहीय आहे. तिथे आज आमची सभा आहे. ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे. ज्याप्रमाणे सांगोल्यात सभा आहे. त्याचप्रमाणे अकलूजला सभा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेत आहे. म्हणजे काय आश्चर्य आहे असं काही नाही. अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
दरम्यान, “ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण जवळजवळ संपुष्टात आणलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाहीय आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहिलो होतो. आता त्यांना काय करायचंय हा निर्णय त्यांना घ्यायचा अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. सुरूवातीला धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोठा डाव टाकला. त्यानंतर धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना देखील आपल्या बाजूने घेत निंबाळकरांच्या अडचणीत वाढ केली. त्यामुळे आता माढ्यात देवेंद्र फडणवीस सक्रीय झाले असून मोहिते पाटील घराण्यातील व्यक्तींच्या भेटीगाठी घेत असल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली” , आढळराव पाटलांचं मोठं विधान
हेही वाचा…“यापुर्वीच कर्तृत्व सिद्ध संधी मिळाली असती तर..”, सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली ‘ती’ खंत
हेही वाचा…“खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार”, तटकरेंचा गीतेंवर घणाघात