बारामती : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची होत आहे. याठिकाणी पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा राजकीय सामना होत आहे. महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे अशी लढत होत असून दोन्ही बाजूने मोठी ताकद दाखवली जात आहे. यातच आता सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आता बंजारा समाजाची ताकद उभी राहताना दिसत आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ॲड. पंडित भाऊ राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे आम्ही प्रभावित व उत्साहित आहोत. देशामध्ये नरेंद्रभाई मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात मजबूत करण्यासाठी कायम महायुतीच्या पाठीशी आहोत. बारामती मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गढ़ मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढेल” असा विश्वास यावेळी पंडित भाऊ राठोड यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“राज्यात अजूनही पवार अन् ठाकरेंची सहानुभूती,” छगन भुजबळांनी घेतला युटर्न, म्हणाले…
गोरबंजारा समाजामध्ये देशाच्या स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य वाढण्याचा विश्वास, यावेळी व्यक्त करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन मोदींच्या सभेचं निमंत्रण
हेही वाचा….“महायुतीत कमळाने धनुष्याला घेऊन घड्याळाचा काटा काढला,” मोदींच्या सभेत घड्याळ गायब
हेही वाचा…भाजपमध्येच का प्रवेश केला ? उज्वल निकम यांंनी सांगितलं कारण, म्हणाले…