नाशिक : महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंना उमेदवारी जाहीर झालीय. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीत अजूनही उमेदवार ठरेना झाला आहे. अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेतल्याने आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी चांगलाच जोर लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखीच नवी नावं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीलाच टोला लगावला आहे.
हेही वाचा…“राज्यात अजूनही पवार अन् ठाकरेंची सहानुभूती,” छगन भुजबळांनी घेतला युटर्न, म्हणाले…
नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीय. मतदानाचा दिवस जवळ येत आहे. असा प्रश्न विचारले असता भुजबळ म्हणाले की, मला वाटलं माझ्यामुळे अडचण होत आहे, त्यामुळे मी निवडणुकीतून दुर झालो. आता अर्ज भरायला देखील सुरूवात झाली आहे. २० मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा. असा टोला लगावत. महायुतीत आम्ही एकत्र काम करणार आहोत. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा आम्ही निवडून आणू असा विश्वास देखील भुजबळांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…“ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, तटकरेंनी ठाकरेंना सुनावलं
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी शरद पवार आणि ठाकरेंवर भाष्य केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा विचारले असता. ते म्हणाले की, राज्यात शरद पवार अन् उद्धव ठाकरे यांची लाट वगैरे असं काही बोललो नाही. हा शब्द माझ्या तोंडात घातलेला शब्द आहे. जेव्हा मला विचारलं की त्यांचं ते काय चाललंय. त्यावर की अनेक जण त्यांच्या पक्षात अजूनही आहेत. जे काही चाललंय आहे. ते काही लोकांना आवडलं नाही. त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि आस्था आहे. राज्यात ज्या काही सभा होतात. त्या सभांना देखील लोक जातात असं म्हणलो होतो. असं भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय.
दरम्यान, भुजबळांनी बारामतीत होत असलेल्या भावजय-नणंद याच्या लढतीवर देखील भाष्य केलं. “माझ्यासाठी तरी हा प्रकार दुखद होता. एका कुटुंबात वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर हा जो काही प्रकार होत आहे. तो अनेक लोकांना पटलेला नाहीय. चुक कुणाची हा भाग वेगळा. पण हे घडलंच नसतं तर चांगलं झालं असतं. असं मला वाटतं. असेही भुजबळांनी भाष्य केलं.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन मोदींच्या सभेचं निमंत्रण
हेही वाचा….“महायुतीत कमळाने धनुष्याला घेऊन घड्याळाचा काटा काढला,” मोदींच्या सभेत घड्याळ गायब
हेही वाचा…भाजपमध्येच का प्रवेश केला ? उज्वल निकम यांंनी सांगितलं कारण, म्हणाले…