रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या सुनील तटकरे आणि अनंत गिते यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच दोन्ही नेत्यांंमध्ये मोठ्या प्रमाणात टिकाटिप्पणी होतांना दिसत आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत जाऊन विचारधारा सोडली अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर आता सुनील तटकरे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेससोबत केलेली युती चालते. मात्र आम्ही भाजपसोबत गेल्यावर आमच्यावर टीका केली जाते. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत तटकरेंनी ठाकरेंना चांगलचं सुनावलंय.
हेही वाचा…भाजपच्या मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट, विरोधकांची जोरदार टिका
दापोली – मंडणगड विधानसभा मतदारसंघात चार जिल्हा परिषद गटात काल मोठ्या उत्साहात प्रचार सभा पार पडल्या. हर्णे जिल्हा परिषद गटातील पाजपंढरी येथे झालेल्या सभेत तटकरे बोलत होते. या प्रचार सभेला आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी आमदार अशोक पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, जयंत साळगावकर, प्रितम उके, मुजीब रुमाणे, साधना बोथरे, आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…पुनम महाजनांचा पत्ता कट, भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर
देशाच्या भवितव्याची जडणघडण करण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण निवडणूक असून माझ्या पाठीशी मतदानरुपी ताकद उभी करावी, असे आवाहन सुनील तटकरे यांनी उपस्थितांना केले. मागील निवडणुकीत या मतदारसंघात पिछाडीवर होतो. मात्र यावेळी या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा सरस मताधिक्य माझ्या पारड्यात येईल, असा विश्वासही तटकरे व्यक्त केला.
आमदार योगेश कदम म्हणाले की, “मुंबईतील ससून डॉक हे महत्त्वाचे केंद्र मानले जात होते त्याप्रमाणे हर्णे आणि पाजपंढरी बंदरात डॉक उभे केले जातील. २०५ कोटी रुपये हर्णे बंदराला मंजूर करुन घेतले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक हर्णे बंदरातून होणार आहे. भविष्याचा विचार करून या बंदरासाठी निधी मिळवला आहे. या भागात मरीन पार्क आणि फूड पार्क करण्याचा संकल्प केला आहे आणि १८० शासकीय जागांपैकी १६० एकरात हे पार्क उभे करणार आहे. शिवाय मच्छीमारीच्या दृष्टीने उद्योग उभे करण्याचा प्रयत्न करणार” असल्याची ग्वाही कदम यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“मात्र आता त्याच दादांना खलनायक ठरवलं जातंय”, धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत”
हेही वाचा…“महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या”, महादेव जानकरांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“पुण्याच्या आरोग्य सुविधांना मिळतोय मोठा बूस्टर “-मुरलीधर मोहोळ