मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी घोषीत केली आहे. विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी निकम यांची वर्णी लागली आहे. याआधी भाजपने मुंबईतील दोन असे एकूण तीन विद्यमान खासदारांचा पत्ता केला आहे. त्यामुळे विरोधकांकडून यावर आता जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माधुरी दिक्षीत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र माधूरी दिक्षीत यांनी यासाठी नकार दिला. त्याआधी भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार, यांच्यासह अनेकांची नावं याठिकाणी चर्चेत होती. मात्र भाजपने उज्जव निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यावर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावरून टिका केली आहे.
सचिन सावंत म्हणाले की, भाजपाने पूनम महाजन यांचे तिकीट कापल्यामुळे आता मुंबईतील तीनही विद्यमान खासदारांना तिकीट दिलेले नाही. याचा सरळसरळ अर्थ तीनही मतदारसंघात भाजपातर्फे शून्य काम झाले. तेथील जनता नाराज आहे. तसेच भाजपाचे प्रतिनिधी कामचुकार असतात असे भाजपाचेच म्हणणे आहे. बाकी पूनमताई, गोपाळ शेट्टी जी आणि मनोज कोटक यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
त्याआधी मुंबई उत्तर मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. गोपाळ शेट्टी यांनी मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त लीड घेऊन निवडणुक जिंकली होती. तरी देखील त्यांचा पत्ता कट केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्याआधी ईशान्य मुंबईतील भाजप खासदार मनोज कोटक यांना देखील भाजपने पुन्हा संधी नाकारली. त्यांच्या जागी भाजपने मिहीर कोटेजा यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे तीन खासदारांचा पत्ता कट केल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाने पूनम महाजन यांचे तिकीट कापल्यामुळे आता मुंबईतील तीनही विद्यमान खासदारांना तिकीट दिलेले नाही. याचा सरळसरळ अर्थ तीनही मतदारसंघात भाजपातर्फे शून्य काम झाले , तेथील जनता नाराज आहे तसेच भाजपाचे प्रतिनिधी कामचुकार असतात असे भाजपाचेच म्हणणे आहे.
बाकी पूनमताई, गोपाळ शेट्टी जी…— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…पुनम महाजनांचा पत्ता कट, भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप