मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून अनेकांची नावं समोर येत होती. मात्र आज भाजपकडून मुंबई उत्तर मध्य मधून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना आता महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्याशी सामना होणार आहे. महायुतीकडून दक्षिण उत्तर मध्य लोकसभेच्या उमेदवारीवर अनेकांची चर्चा होती. त्यावर आता निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
२०१४ सालापासून मुंबई उत्तर मध्य मधून भाजपच्या खासदार पुनम महाजन खासदार होत्या. परंतु भाजपने पुनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. यातच उज्वल निकल आता पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवत असल्याने या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
दरम्यान, मुळचे जळगावचे असलेले उज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मधून उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. उज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील अनेक केसस यशस्वीपणे लढवल्या आहेत. मध्यंतरी राज्यात झालेल्या पक्ष फुटीत उज्वल निकम यांनी यावर वारंवार केससबद्दल माहिती दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप