नाशिक : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जाहीर सभांना ज्याप्रकारे गर्दी होत आहे. त्यावरून त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचे दिसून येते. असं मोठं विधान महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या विधानानंतर भुजबळांनी पुढच्या वाक्यात नरेंद्र मोदींंचं कौतुकही केलं. मतदार यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तिसऱ्यांदा एक मजबुत सरकार निवडून आणतील असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांना पुन्हा विचारले असता. त्यांनी युटर्न घेतल्याचे दिसून येतंय.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी शरद पवार आणि ठाकरेंवर भाष्य केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा विचारले असता. ते म्हणाले की, राज्यात शरद पवार अन् उद्धव ठाकरे यांची लाट वगैरे असं काही बोललो नाही. हा शब्द माझ्या तोंडात घातलेला शब्द आहे. जेव्हा मला विचारलं की त्यांचं ते काय चाललंय. त्यावर की अनेक जण त्यांच्या पक्षात अजूनही आहेत. जे काही चाललंय आहे. ते काही लोकांना आवडलं नाही. त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि आस्था आहे. राज्यात ज्या काही सभा होतात. त्या सभांना देखील लोक जातात असं म्हणलो होतो. असं भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा…भाजपच्या मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट, विरोधकांची जोरदार टिका
पुढे बोलतांना भुजबळ असेही म्हणाले की, काहीही झालं तरी हा प्रश्न कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचा नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकतो हा मुद्दा आहे. याचाच विचार मतदार करत असता. आज जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थीत असेल तर ते पाहता मोदी साहेबांसारखं खंबीर नेता आपल्या बाजूने आहे. त्यामुळे शेवटी लोक आहेत. त्यांना जे काही योग्य वाटेल ते करतील. अन् त्यांना ते मतदान करतील असेही भुजबळांनी सांगितलं.
दरम्यान, भुजबळांनी बारामतीत होत असलेल्या भावजय-नणंद याच्या लढतीवर देखील भाष्य केलं. “माझ्यासाठी तरी हा प्रकार दुखद होता. एका कुटुंबात वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर हा जो काही प्रकार होत आहे. तो अनेक लोकांना पटलेला नाहीय. चुक कुणाची हा भाग वेगळा. पण हे घडलंच नसतं तर चांगलं झालं असतं. असं मला वाटतं. असेही भुजबळांनी भाष्य केलं.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, तटकरेंनी ठाकरेंना सुनावलं
हेही वाचा…“मात्र आता त्याच दादांना खलनायक ठरवलं जातंय”, धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत”
हेही वाचा…“महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या”, महादेव जानकरांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“पुण्याच्या आरोग्य सुविधांना मिळतोय मोठा बूस्टर “-मुरलीधर मोहोळ