औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्याविरोधात मित्राच्या पत्नीचा विनयभंग करण्यासह धमकावणे, बळेच घराच शिरणे, पीडितेच्या पतीसह दिराला मारहाण करणे आदी कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातच आता विशाल ढुमे यांना गृह विभागाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
शहरातील एका गैरवर्तन करणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याला गृह विभागाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन मी धाव घेतली होती. शिवसेना ही कायम आई बहिणींच्या सरंक्षणासाठी कायम सज्ज असेल. जनतेच्या रक्षणार्थ कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या मागे शिवसेना कायम उभी राहणारी संघटना आहे. मात्र आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही आवाज उठवणार तो पण जोरात उठवणार असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
या प्रकरणात अंबादास दानवे आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लक्ष घालून विशाल ढुमेंविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची याप्रकरणात रविवारी भेट घेतली होती. विशाल ढुमे यांनी मात्र या प्रकरणात आपली व पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले.
शहरातील एका महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याला गृह विभागाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन मी धाव घेतली होती. शिवसेना ही कायम आई बहिणींच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असेल. (१/२)
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 18, 2023
Read also
- “भाजपची रणनीती माणसं फोडा अन् मत मिळवा, नाशिकमध्येही तेच झालं”
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर.! पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी
- जगातल्या सर्वोत मोठ्या पक्षाला 5 उमेदवार मिळेना, भाजपचा शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत अपक्षांना पाठिंबा
- कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
- “सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक