लातूर : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील सर्वच्या सर्व जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे. कुठेच संभ्रम निर्माण झाला नाही, परंतु नाशिकच्या जागेवरून थोडा अधिक गोंधळ झाला आहे. त्याबाबतीत आज उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी एका जागेची मागणी केली होती. त्याद्वारे त्यांना ती जागा देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. असं काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
वाद विवाद असं काही नाही, काही ठिकाणी इच्छुकांना अपक्ष तर काहींना पक्षांकडून निवडणुका लढवायच्या असतात. त्या विशेष समन्वय साधून त्या सोडवायच्या असतात. काॅंग्रेसमध्ये कुठेही गोंधळ नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीतही फोडा फोडीच राजकारण भाजपनेच केलं आहे. माणसं फोडून मत घेण्याची ही भाजपची आजपर्यंत रणनीती राहिली आहे. हे आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. त्याचाच प्रयत्न नाशिकमध्ये भाजपकडून काही प्रमाणात झाला आहे. असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.
“शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
आगामी काही दिवसांनी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी मतदान होणार आहे. पाच ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणुक होत असून त्यासाठी उमेदवारांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. मात्र यावेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पलटी घेतल्याने नाशकात मोठा गोंधळ बघायला मिळाला. मग त्याठिकाणी आता डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना अद्यापही भाजपने पाठिंबा जाहीर केला नाही.
नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
सत्यजित तांबे यांनी अजून पर्यंत कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. पंरतु जर सत्यजित तांबे यांनी आमच्याकडून समर्थन मागितलं तर केंद्रातील आणि राज्यातील कार्यकाराणीत याबद्दल आम्ही समर्थन मागण्यासाठी प्रयत्न करू. परंतु अजूनही त्यांनी कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. तसेच नाशिक मध्ये भाजप सध्या अपक्षांसोबत आहे आणि तो काळ ठरवले. अस चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर.! पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी
- जगातल्या सर्वोत मोठ्या पक्षाला 5 उमेदवार मिळेना, भाजपचा शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत अपक्षांना पाठिंबा
- कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
- “सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक
- ” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”