IMPIMP
These six MPs of the state took the oath of office, Modi became the Prime Minister of the country for the third time These six MPs of the state took the oath of office, Modi became the Prime Minister of the country for the third time

राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयुष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली.

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त 

गेल्यावेळी महाराष्ट्रातील ८ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यापैकी नारायण राणे, डॉ.भागवत कराड, यांना यंदा स्थान मिळाले नाही. तर रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचा विचार झाला नाही. यंदा राज्यातील ६ जणांचाच समावेश करण्यात आला. यात नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली. तर मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे यांची पहिल्यांदात मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे.

हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ? 

दरम्यान, सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारामन, एस, जयशंकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी एनडीएमधील काही राजकीय पक्षातील खासदारांनी देखील कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान 

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ? 

हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं 

हेही वाचा..पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, आज मंत्रीपदाची शपथ घेणार ?