IMPIMP
This is why the dynamic governance of the grand alliance government This is why the dynamic governance of the grand alliance government

“हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार ?” पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ?

पुणे : पोर्श कार अपघात प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलासह बाप आणि आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. तर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस निरीक्षकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. तर ब्लड सॅम्पलमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागील काही दिवसापासून पुण्यातील हे प्रकरण चांगलंचं गाजत आहे. यावरून आता शरद पवार गटाने पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टिका केलीय.

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

पुण्यातील ससून रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं रुग्णालय आहे. परंतु सद्या ससूनमधील गलथान कारभारामुळे जनतेच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र सत्ताकारणात व्यस्त आहेत ही दुर्दैवी बाब!असं म्हणत शरद पवार गटाने अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

दरम्यान, दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीच्या रक्ताचे सॅम्पल ३ लाख रूपयांसाठी ससूनच्या डॉक्टरांनी कचऱ्यात फेकले. महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करी करून तरूणाईला बरबाद करणाऱ्या ललित पाटीलच्या रिपोर्टमध्ये फेरफार करण्यास तसेच रूग्णालयातून ललितचा फरार होण्यास ससून रूग्णालय प्रशासनाने मदत केलीय. ससून रूग्णालयातील अस्वच्छता आणि भोंगळ कारभारामुळे उंदिर चावून रूग्णाचा मृत्यू. हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार असा सवाल देखील त्यांनी केलाय.

READ ALSO :

हेही वाचा..छगन भुजबळांचा यू-टर्न, म्हणाले, “एवढा काही मी मुर्ख नाही की…,” 

हेही वाचा…“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

हेही वाचा…विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ? 

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू 

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं?