IMPIMP
This wandering soul will not leave you now Sharad Pawar scolded Modi again This wandering soul will not leave you now Sharad Pawar scolded Modi again

“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं

नगर : राजकीय पक्ष आम्ही एकमेकांवर टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी? माझ्या बाबतीत बोलले की भटकती आत्मा..! माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकता आत्मा आहे, एका दृष्टीने बरं झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणार आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. असं म्हणत शरद पवारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिवस नगर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी” 

पुढे बोलतांना ते म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास दिला आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीसमूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे, हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे, की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, सत्ता जर मिळवण्याची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी दाखवली.

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

निवडणुका येतील, त्या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ, लोकांना बरोबर घेऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्यासंबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशातील लोक मोदी सरकारने प्रश्न जे काढले, त्या प्रश्नांना फारसे लोक महत्त्व देत नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, तर लोकांच्यात चर्चा अशी होती, की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं, आनंद आहे उद्या मी आयोध्येला गेलो, तर मंदिरात जाईन. त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही. ते चुकीचं काम राजकारणासाठी मोदींनी केलं, त्याची नोंद अयोध्येतील जनतेने घेतली. राम मंदिराचे स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता, त्याचा १००% पराभव अयोध्येतील जनतेने केला हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्याचा फारसा विचार करायचा नाही. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली 

हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल” 

हेही वाचा…“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट 

हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी