IMPIMP
This will be Modi's last meeting in Mumbai as Prime Minister, Modi will retire after two years This will be Modi's last meeting in Mumbai as Prime Minister, Modi will retire after two years

“पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असणार, दोन वर्षांनी मोदी रिटायर होतील”

मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. यातच आज महायुतीची सांगता सभा शिवतीर्थावर तर महाविकास आघाडीची बीकेसीत सभा होत आहे. यातच महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, तसेच मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे सर्वच नेते बीकेसीत गरजणार आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.

हेही वाचा..दिंडोरीत भारती पवारांना कांदा रडवणार, भुजबळांनी थेट मोदींना पत्र धाडलं 

दोन वर्षानंतर नरेंद्र मोदी याचं वय ७५ वर्ष होणार आहे. त्यामुळे तेव्हा ते भाजपचे नेते देखील राहणार नाहीत. त्यानंतर भाजपचं काय होणार ? कारण यावेळी भाजपचं केंद्रात सरकार जातंय. त्याच्यानंतर दोन वर्षांनी मोदी रिटायर होतील. मोदी झोळी घेऊन जातील. मग तुमच्या पदरात काय पडणार ? येत्या ०४ जूनला डीमोदीनेशन होय. अन् कदाचित मुंबईतील सभा पंतप्रधान म्हणून मोदींची शेवटची असणार. असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला आहे.

हेही वाचा…मोठी बातमी…”लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीतील मोठा लोंढा महायुतीत दाखल होणार” 

यातच सर्वच प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, शरद पवारांचा निर्णय तो त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रामुख्याने माझ्या पक्षाचा प्रमुख मी आहे. तीस वर्ष एकत्र येऊन आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही. तर यांच्याबरोबर कसं काय विलीन होणार ? कदाचित शरद पवार मिंधे आणि इतर छोट्या प्रादेशिक पक्षांबद्दल बोलले असतील. असेही ठाकरेंनी सांगितले.

READ ALSO :

हेही वाचा…विधानसभेत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत अटळ, युगेंद्र पवारांकडून तयारी सुरू 

हेही वाचा…“धुळ्यात सुभाष भामरेंचा विजयरथ कॉंग्रेस रोखणार” ? राजकीय गणितं बदलली 

हेही वाचा…“मोदींनी गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोलावं,” उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर तिखट प्रहार 

हेही वाचा..“अखंडपणाने विरोधकांना शिवीगाळ देणारे मोदी हे..,”शरद पवारांची मोदींवर जहरी टिका 

हेही वाचा..ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक फोडले, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर म्हणाले…