भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीसांना टोला लगावला.
‘कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे’, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय.
कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोमणा मलिक यांनी लगावला. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कॅबिनेट बैठकीचा मदतीचा निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल, सरकार नक्कीच मदत जाहीर करेल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.
Read also :
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; कोणत्या मुद्द्यावर बोलणार हे मात्र गुपित.. https://t.co/qlnY7J8r73 @PMOIndia @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @Devendra_Office
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020