IMPIMP
Transfer Tukaram Munde to USA or Russia now Vijay Vadettivar's scumbag Transfer Tukaram Munde to USA or Russia now Vijay Vadettivar's scumbag

“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

पुणे : राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा राज्य सरकारने बदली केली आहे. मागच्या वर्षी त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. आता तुकाराम मुंडे यांची विकास आयुक्त ( असंघटित कामगार ) खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांची १९ वेळा बदली करण्यात आलीय. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केलीय.

हेही वाचा…“नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीवरून रसद”, रवी राणांचा गंभीर आरोप 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला वाटतं की तुकाराम मुंडे यांची बदली आता थेट अमेरिकेत केली पाहिजे. त्यांची देशात कुठेही बदली केली, तरी त्यांचा त्रास होणारच आहे. अशी राजकीय नेत्यांनी भावना तयार केली आहे. मग ते आधीचे राजकारणी असोत, किंवा आताचे असो. मात्र त्यांची एकदाच काय ते अमेरिकेत किंवा रशियात बदली करावी. आवश्यकता वाटल्यास त्यांना चीनमध्येही पाठवावे. असा खोचक टोलाही विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लगावलाय.

हेही वाचा..“आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं, शरद पवारांचं वेगळं” 

दरम्यान, तुकाराम मुंडे यांनी सोलापुरचे उपजिल्ह्याधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकिर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आलीय. विशेष म्हणजे १६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांची १९ वेळा बदली करण्यात आलीय.

READ ALSO :

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

हेही वाचा..चिखलात माखलेले पाय पटोलेंनी कार्यकर्त्यांकडुन घेतले धुवून, व्हिडीओ व्हायरल 

हेही वाचा…“फडणवीसांनी मला या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलं “, नरेश म्हस्केंनी सांगितला विधान परिषदेचा किस्सा 

हेही वाचा..ओबीसींसाठी छगन भुजबळ पुन्हा मैदानात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार ‘ही’ मागणी 

हेही वाचा…“वेड्यांचा बाजार भरवणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही,” म्हणून.. दिलीप वळसे पाटलांनी आव्हाडांना सुनावलं

Leave a Reply