मुंबई : मागील अनेकदिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न चर्चेत आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस खात्यातील एकूण 150 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यामध्ये 43 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी करत सर्व अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
आदेशात म्हटले आहे की, पोलीस महासंचालक यांच्या आदेशानंतर संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन उपरोक्त अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा.
नवीन ठिकाणी पोस्टिंग देण्यात आलेल्या 150 अधिकाऱ्यांमध्ये 43 आयपीएस अधिकारी व 107 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.