मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झालेला असला तरी लोकप्रतिनिधिना कोरोनाची लागण होतंच आहे. नुकतीच महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते आणि परिवह मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परबही करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळेच आज मुंबईत दोन हजाराच्या आगेमागे रुग्णसंख्या दिसत आहे. करोना नियंत्रणासाठी महापालिका कटीबद्ध असून आजपासून मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या किमान २० हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.
Read Also
शरद पवार समजायला सात जन्म लागतील, राष्ट्रवादीच्या नेत्याचे भाजपला चोख प्रतिउत्तरhttps://t.co/eI3RHWC7xw#Anilbonde #SharadPawar #NCP #BJP @maheshtapase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020