मुंबई : आरक्षणासंदर्भात न्यायलायने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. आता फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यसभेतील भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले मैदानात उतरले आहेत. या वादाचा जातीशी काही संबंध नसल्याचे वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.
ब्राह्मण असल्याने फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप केला जातोय यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी देवेंद्र माझा खास मित्र असून या प्रकरणाचा जातीशी काही संबंध नसल्याचे मत व्यक्त केलं.
मुख्यमंत्री, पंतप्रधान यासाठी पद असतात. लोकांनी निवडूण दिलं तर तुम्ही त्या पदावर बसता. आज देवेंद्र माझा खास मित्र आहे. त्याचं बिचाऱ्याचं काय चुकलं ? त्याचं काय चुकलं तुम्हीच मला सांगा ?,” असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “त्याचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं. या प्रकरणामध्ये ब्राम्हणचा संबंधच काय आहे. उगीच आपलं काहीतरी. जाता जाता जात नाही ना त्याला जात म्हणतात,” अशा शब्दांमध्ये या विषयावरुन जातीचे राजकारण करणाऱ्यांना सुनावलं. उदयनराजे यांनी पुढे बोलताना, आपण लोकशाहीमध्ये राहतो तरी लोकं जात पाहून मतदान करत असल्याने चांगले लोकं पदापासून लांब राहतात असंही म्हटलं आहे.
Read Also
…नाहीतर खासदारकीचा राजीनामा देणारhttps://t.co/Xu5M1EqKGK#Chhatrpatiudayanraje #MPUdayanraje #MarathaReservation #SataraMP @Chh_Udayanraje
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 18, 2020