मुंबई: तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? अशी घणाघाती टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुनच नितेश राणे यांनी टीका केली आहे.
जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..
तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..
मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
मानले @BJYM4Mumbai ला !!— nitesh rane (@NiteshNRane) June 16, 2021
ऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे
हे पण वाचा: मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.