मुंबई : एखादा मंत्री ज्यावेळी आजारी पडतो. त्यावेळी त्याचा कारभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला जातो. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाला जरी गुंगीचं औषध दिलं होतं. तरी त्यांनी त्या 40 मिनिटांसाठी दुसऱ्यासाठी कारभार सोपवला होता. मग उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कारभार का दुसऱ्याकडे सोपवला नाही. असा सवाल दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे तसेच सुभाष देसाई सारखे नेते होते. त्यांना काही काळ प्रभारी म्हणून मुख्यमंत्र्याचा कारभार दिला पाहिजे होता. परंतु ते जे आम्हाला विश्वासघातकी म्हणताहेत ते बरोबर नाही असंही ते म्हणाले.
“बाबा तुच आहेस का रे”? अजित पवारांनी केली ‘त्या’ फोटोची शहानिशा
आज मुंबईत आमच्या आमदारांबाबत अनेक गद्दार असा उल्लेख असलेले पोस्टर लावले जातात. त्यावेळी तुम्ही जे म्हणाल ते बाकीचे लोक म्हणताहेत. तुम्ही एकदा नगरसेवक, विधानसभा निवडणुकीसाठी उभं राहा ना. तेव्हा तुम्हाला समजेल की गद्दार काय असतं. असा इशारा देखील दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ज्यावेळी तुम्ही आम्हाला सांगताहेत की राजीनामा देऊन निवडून या. मग 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी तुम्ही राजीनामा देऊन का निवडून आले नाहीत. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“अजितदादा लवकरच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार”; सचिन खरात
तुमच्याबाबत आम्हाला आदर आहे. त्यामुळे आम्ही गप्प राहतो. नाहीतर उत्तर हे प्रत्येकाला देता येतं. एकनाथ शिंदे यांनीच शिवसेना वाढवण्याचं काम केलं आहे. कोरोना काळात सगळ्याच जास्त काम त्यांनीच केलं आहे. मग का त्यांनी ऐकून घ्यावं? असा सवाल देखील त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील असं म्हणत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गट आणि भाजपवर आरोप-प्रत्यारोप करणारे संजय राऊत हे टीकचे धनी होत आहेत. असं असलं तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. असं म्हणत त्यांनी टिका केली आहे.
महाराष्ट्राचा बदला, झारखंडने घेतला, भाजपचे 16 आमदार फुटणार? एकच खळबळ
उद्धव ठाकरे त्याच्या बाहेर येत नाहीत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रश्न आता कोर्टात आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. पण धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना शोभणारे नाही. ते स्वत:च म्हणत आहेत की सगळे बाण निघून गेले. आता ते रिकामटेकडे धनुष्य घेऊन बसले आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंना शोभायचे. यांना लॉलिपॉप वगैरै असं काहीतरी देऊन टाका. उद्धव ठाकरेंना ते शोभेल, असा टोमणा राणेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा
- “धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभत नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”
- “चुक झाली असेल तर फासावर लटकावा, पण यात सोनिया गांधींना ओढू नका”
- बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के
- बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के