IMPIMP
uddhav thackeray on rahul gandhi uddhav thackeray on rahul gandhi

“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल

मुंबई : सध्या राज्यातील पावसाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून चांगलच गाजत आहे. यातच काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टिका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ 

अंबादास दानवेंनी केलेल्या प्रकरावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून माफी मागितली आहे. यातच अंबादास दानवे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही षडयंत्र रचून करण्यात आली आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे निलंबित केलं गेलं असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

तर मला सांगा राहुल गांधी काय चुकीचं बोलले ? त्यांनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? त्यांना भगवान शंकराचा फोटोही दाखवण्याची परवानगी दिली नाही. हे हिंदुत्व आहे का ? आपणही खुलेपणाने जय श्री रामच्या घोषणा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी खुलेपणाने प्रचारसभांमधून जय श्रीरामच्या घोषणा देतात. पण जर भाजपाव्यतिरिक्त दुसरं कुणी तसं काही बोललं. तर लगेच तो गुन्हा ठरतो ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

Leave a Reply