अमरावती : उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात, बाळासाहेबांची विचारधारा हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसी तर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर दसरा मेळाव्यानिमित्ताने सभा पार पडली. त्यावर त्या बोलत होत्या.
#चला_बीकेसी होतोय, ट्विटवर ट्रेंन्ड..! मुंबईत आज सभांचा पाऊस पडणार
नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे हे वारंवार बाप चोरला म्हणून सांगत आहेत. परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात. विचारधारा ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे यांचे संतुलन पुर्ण बिघडलं आहे. हे जनतेने पाहिलं आहे. असं देखील त्या म्हणाल्या.
“मुंडे साहेबांसोबत नरेंद्र मोदी, अमित शहांचा देखील वारसा चालवतेय”; पंकजा मुंडे
तसेच पुढे बोलताना त्यांनी असं म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी फक्त चित्रपटातले डॉयलॉग सांगितले. अडीच वर्ष त्यांनी घरात बसून लोकांना फेसबुकवर आश्वासन दिलं. ते पण त्यांना पुर्ण करता आलं नाही. बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसोबत आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं आहे.
“माझा मेळावा चिखलफेकऱ्यांचा नाही”..; पंकजा मुंडेंचा शिंदे, ठाकरेंना टोला
दरम्यान, शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचा खोकेसरकार म्हणून उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर देखील कडाडून टिका केली. तर राष्टीय स्वंय संघातील एका नेत्यांनी महागाईवर भाष्य केल्याने ठाकरेंनी त्यांचं कौतुक देखील केलं. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Read also
- “शिंदेंना पुढचा मेळावा बिहार, युपीमध्ये घ्यावा तेवढाच…”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
- “जयदेव ठाकरेंचा सल्ला ऐका, अन् सरकार बरखास्त करा आणि निवडणुक घ्या”
- “आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावलीय, पण त्यांच्या मुलाने काय केले?”; शरद पोंक्षे
- “गद्दार, हिंदुत्व, पन्नास खोके, अन् आता खोकेश्वर”; शिवतीर्थ ठाकरेंनी गाजवलं
- शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप…! सभेआधीच झाला राडा