IMPIMP
उद्धव ठाकरेंचा कित्ता एकनाथ शिंदेंनी गिरवला ; नामांतराला पुन्हा मंजूरी, श्रेयवाद वाढणार? उद्धव ठाकरेंचा कित्ता एकनाथ शिंदेंनी गिरवला ; नामांतराला पुन्हा मंजूरी, श्रेयवाद वाढणार?

उद्धव ठाकरेंचा कित्ता एकनाथ शिंदेंनी गिरवला ; नामांतराला पुन्हा मंजूरी, श्रेयवाद वाढणार?

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली होती.  ठाकरे सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे सरकारने स्थगिती देण्यात होती.  आता या नामांतराच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता श्रेयावादानुसार लढाई सुरू होण्याची शक्यता आहे.

आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्तांची मॅरेथॉन बैठक 

शनिवार झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काल महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय आला. तसेच उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे.

“सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची”; करकपातीवरून भुजबळांची सरकारवर टिका 

धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकनाथ शिंदे सोडला तर एक ही बंडखोर आमदार निवडून येणार नाही. बाळासाहेबांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत असंच होतंय. असं म्हणत एकनाथ शिंदे गावाकडे शेतीच करायला जाणार आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला. आम्ही काल नामांतराच्या मुद्दावरून उठाव केल्यानंतर त्यांनी लगेचच कॅबिनेट बैठक बोलवली होती. ते संभाजी महाराजांना घाबरले आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव देखील संभाजी आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचं अपमान करू नका, असं देखील खैरे म्हणाले.

“त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता”; केसरकरांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर 

दरम्यान,  आम्ही देखील ४० वर्ष शिवसेनेत रक्ताचं पाणी केलं आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना फोडायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही.  अब्दुल सत्तार म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यसमोर कुणाचाच बाण टिकणार नाही. यावर बोलताना म्हणाले की, हा धनुष्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनी शिवसेनेची घटना वाचावी, असाही सल्ला खैरे यांनी दिला आहे.

Read also