पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकत असलेले अनेक विद्यार्थी निकालाबाबतच्या समस्यांना सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी आपण व्हर्चुअल आणि फिजिकली अशा दोन्ही पद्धतीने ‘युक्रांद’च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठानेही सकारात्मक उत्तरे देऊन काही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. मात्र, अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.
विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेतून आपण आंदोलन करण्याचे ठरवले. त्यानुसार आज अहमदनगर, नाशिक, पुणे आणि इतर ठिकाणाहून बरेच विद्यार्थी आंदोलनासाठी पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उपस्थित राहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या अडचणी बोलून दाखवल्या. युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये सातत्याने विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे काम पुणे जिल्हा युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केले. तसेच अध्यक्ष सचिन पांडुळे यांनी आजच्या आंदोलनाची हाक दिली.
यावेळी संघटनेचे कार्यवाह संदीप बर्वे, राज्यसंघटक जांबुवंत मनोहर, सहकार्यवाह अप्पा अनारसे, रवी लाटे, नीलम पंडित उपस्थित होते. ठोस निर्णयाचे परिपत्रक घेऊनच इथून जाणार असा निर्णय युक्रांद आणि विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानुसार सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरात आंदोलकांनी ठिय्या दिला. आंदोलनादरम्यान कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विद्यापीठ प्रशासनाने मान्य केलेल्या मागण्या:
विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी सोडवून देण्यासाठी कुलगुरू सकारात्मक आहेत. त्यांनी आज केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाला सर्व तक्रारींवर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
निर्णयाची घोषणा –
1) आज आंदोलनात सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारी तत्काळ सोडवणार.
2) देशाच्या कानाकोपऱ्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे आज आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाही पण त्यांना अडचणी आहेत. अशांना विद्यापीठाकडून तीन दिवसांसाठी 7 ते 9 डिसेंबर कालावधीत एक ईमेल आयडी दिला जाणार आहे. त्या ईमेलवर ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी पाठवण्याचे विद्यापीठ प्रशासनाने अवाहन केले आहे.
ईमेल आयडी – [email protected]
3) सर्व विद्यार्थ्यांचा (5 ते 6 हजार विद्यार्थी) 15 डिसेंबर रोजी निकाल लावणार असल्याचे कुलगुरूंनी कबूल केले आहे.
संपर्क –
कमलाकर शेटे
7709779977
सचिन पांडुळे
9096313022
विद्यापीठाचे मूळ परिपत्रक:
एप्रिल/मे, २०२० मधील अंतिम सत्र/अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर, २०२० मध्ये संपन्न झाल्या असून परीक्षांचे निकालही जाहीर झालेले आहेत. काही विषयांच्या परीक्षा तांत्रिक कारणास्तव पूर्ण न होणे, प्रश्न न दिसणे, वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिका सबमिट होणे व इतर अनुषंगिक कारणे यामुळे काही विद्यार्थ्यांन निकालामध्ये Absent , शून्य गुण व कमी गुण येणे असे प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
प्राप्त तक्रारीची दखल विद्यापीठाने घेतली असून मा. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निर्णयानुसार तांत्रिक प्रक्रियेचा अवलंब करता अंदाजे ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांचे सुधारीत निकाल १५ डिसेंबर, २०२० पर्यंत जाहीर होतील. या निकालाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अजून काही अडचणी अथवा तक्रारी असतील तर त्यांनी [email protected] या ई – मेल आयडीवर दिनांक ९ डिसेंबर, २०२० पर्यंत कृपया पाठवाव्यात.
महेश काकडे
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे