नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील बलात्काराच्या घटनानंतर काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर काँग्रेसशासित पंजाब आणि राजस्थानमधील बलात्काराच्या घटनानंतर भाजप नेत्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला होता. आता या टीकेला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले असून, उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील सरकारं बलात्कार झाल्याचे नाकारत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षीय दलित मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. त्यावरूव भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती.
Unlike in UP, the governments of Punjab and Rajasthan are NOT denying that the girl was raped, threatening her family and blocking the course of justice.
If they do, I will go there to fight for justice. #Hathras
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 24, 2020
राहुल गांधींनी ट्विट केले की, उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब आणि राजस्थानमधील सरकारं मुलीवर बलात्कार झाल्याचे नाकारत नाहीत. त्यांच्या कुटुंबाला धमकावले जात नाही, तसेच न्याय मिळवण्यापासून देखील रोखले जात नाही. त्यांनी तसे केल्यास मी स्वतः न्यायाच्या लढ्यासाठी तेथे जाईल.