उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांचे निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होते. चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री चौहान यांची 12 जुलै रोजी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली होती. त्यांनंतर त्यांना लखनऊ येथे संजय गांधी पीजीआय रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना गुरुग्राम मेंदाता रुग्णालयात हलविण्यात आले. काल आलेल्या बातमीनुसार त्यांनी किडनी काम करणं बंद झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. त्यातच आज त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.