नागपूर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे मात्र काँग्रेसने देखील त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगितले होते असा खुलासा वडेट्टीवार यांनी केला आहे.
उर्मिला मातोंडकर आमच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Read Also
पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का ? संजय राऊत यांनी दिले 'हे' उत्तरhttps://t.co/q4J3ZOuxxE#PankajaMunde #SanjayRaut #Shivsena #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020