मुंबई – मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. कंगना मुंबईत आली आहे. एरवी मुंबईविरोधात बोलणारी कंगना आता मात्र मुंबईचं कौतुक करू लागली आहे. माझी प्रेमळ मुंबई असा उल्लेख तिनं केला आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी यावरून कंगनाला चांगलंच लक्ष्य केलं आहे.
चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली आहे. ती मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे”, असं ट्विट कंगनानं केलं आहे.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra 🙏 pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे.
“for standing up for my beloved city Mumbai “ 🤔🤔🤔
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…😂😂😂— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020