इस्रायल : इस्रायलमध्येही करोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी करोना लस घेतली. नेतन्याहू ही करोना लस घेणारे इस्रायलमधील पहिले व्यक्ती आहेत. लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.
याआधी अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये करोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आपण स्वत: ला पहिली लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील करोनाची लस टोचण्यात आली.
या दोन नेत्यांनी फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात आली. पंतप्रधान नेतन्याहू आणि आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना लस दिल्यानंतर करोना लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
זריקה קטנה לאדם, צעד ענק לבריאות של כולנו.
**
בדרך לחיסון הערב חשבתי הערב על הילדים שדואגים להורים שלהם.על הנכדים שרוצים לחבק את סבא וסבתא בחיבוק אמיתי.
על בעלי העסקים שיוכלו לפתוח את העסקים שלהם.
על כך שנוכל לפתוח מחדש את המדינה שלנו ולהחזיר אותה למה שהיא הייתה. pic.twitter.com/5QGoG7HZnn
— Benjamin Netanyahu (@netanyahu) December 19, 2020
लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा विश्वास
लस घेतल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. हा आनंदाचा क्षण असून देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इस्रायल पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायलच्या फ्रंट लाइन वर्कर्सना १० रुग्णालये आणि लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरण मोहीम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे. लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात ६० हून अधिक वयाच्या नागरिकांना प्राथमिकतेच्या आधारावर लस दिली जाणार आहे.
२७ डिसेंबरपासून नागरिकांना लस देणार
इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम २७ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इस्रायल दररोज ६० हजार नागरिकांना करोनाची लस देण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेसाठी फायजरच्या लस इस्रायलमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. इस्रायलने फायजरसह ८० लाख डोससाठी करार केला आहे.
दरम्यान, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने आणखी एका लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने मॉडर्नाने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी हा दुसरा पर्याय असल्याचे समितीने म्हटले आहे.
Read Also :
अयोध्या विवाद : अशी असणार अयोध्येची पाच एकर जागेवरील मशीद; डिझाईन झालं प्रसिद्ध
आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
‘पाकिस्तानाहून अधिक मुस्लीम भारतात, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा’
बंगाल जिंकण्यासाठी अमित शहांचा हा आहे ‘मेगा प्लान’