मुंबई : लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसींअभावी 18 वर्षांपुढील नागरिकांना लस देता येणार नाहीये. एकीकडे महाराष्ट्रात राज्य सरकार लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे लसच नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे.
आता मुंबईत लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे पुढचे किमान 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली आहे.
वीन पुरवठ्याबाबत निश्चित माहिती मिळेल. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना त्याची माहिती दिली जाईल आणि सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू केलं जाईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून 63 लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात 73 लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मात्र, लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबवावे लागले आहे. लसच नसल्याने 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.