मुंबई : 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच, आता 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ‘लस मोफत आणि विकत घेता येईल अशी दोन्ही सुविधा असावी’, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लस ही मोफत आणि विकत घेता येईल, असे दोन्ही पर्याय लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकार ने सरसकट लस मोफत देण्यापेक्षा लसीकरण केंद्रात ज्यांना मोफत हवी व ज्यांना विकत घेता येईल अशा दोन्ही ची सुविधा करावी. तसेच लोकांना आवाहन केल्यास बऱ्यापैकी लोक ज्यांना शक्य आहे ते मोफत घेणे टाळतील व सरकार ला सहकार्य करतील. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 28, 2021
राज्य सरकार ने सरसकट लस मोफत देण्यापेक्षा लसीकरण केंद्रात ज्यांना मोफत हवी व ज्यांना विकत घेता येईल अशा दोन्ही ची सुविधा करावी. तसेच लोकांना आवाहन केल्यास बऱ्यापैकी लोक ज्यांना शक्य आहे ते मोफत घेणे टाळतील व सरकार ला सहकार्य करतील, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.