IMPIMP
Varsha Gaikwad's attack is not acceptable to us, the rashness of taking responsibility Varsha Gaikwad's attack is not acceptable to us, the rashness of taking responsibility

“,मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हाला मान्य नाही”, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

मुंबई : पालिका आणि नगर विकास खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मुळातच होर्डिंग लावण्याची परवानगी नसलेल्या जागेवर क्षमतेपेक्षा तिप्पट आकाराचे होर्डिंग लावल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले कसे नाही ? एवढ्या कमालीच्या दुर्लक्षिपणाबाबत तुम्ही आता कसली सारवासारव करणार आहात. असा खोचक सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी केलाय. घाटकोपर होर्डिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली होती. त्यावर वर्षा गायकवाड यांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा नाशकात ८०० कोटींचा घोटाळा, चौकशी करण्याची राऊतांची फडणवीसांकडे मागणी 

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,  ‘या सरकारला केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यांवर पोकळ भाषणे देता येतात. विश्वगुरुंच्या नावावर बतावण्या करता येतात. प्रत्यक्षात या सर्वांनी देशातील नागरिकांच्या जीवाची किंमत कवडीमोलावर आणून ठेवलीये. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईत नागरिकांचा किड्यामुंग्याप्रमाणे जीव गेला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे.

हेही वाचा..“त्यावेळी ठाकरेंना वाटतं होतं की सरकार मोडावं अन् भाजपसोबत जावं”, तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट 

घरातील माणूस गमावलेल्या १४ कुटूंबीयांच्या आक्रोशाला कोण उत्तर देणार ? असा सवाल करत तुम्ही सर्वांनी आपली कर्तव्ये व्यवस्थित बजावली असती तर या निष्पापांचा बळी गेला नसता. असा संताप देखील वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. तर आपल्या घरातील माणूस गमावलेल्या प्रत्येकाची हीच तक्रार आहे. त्यांच्या दुःखाची कल्पनाच न केलेली बरी ! या बेजबाबदारपणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हांला मान्य नाही. दुर्घटनेला जबाबदार दोषींवर तातडीने कडक कारवाई व्हायलाच हवी. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

दरम्यान,  न्यायालयात इमारत दुर्घटनेतील बळींची प्रकरणे, पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे जीव गमावलेल्या पिडीतांशी संबंधित खटले बराच काळ खोळंबली आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅकवर व्हायला हवी. शिवाय अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पाऊले न उचलणा-या दोषींवर लगाम लावायलाच हवा. असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

READ ALSO :

हेही वाचा…“अरविंद सावंताचा मोठा करिश्मा, विरोधात उमेदवार हुडकायला ..,” जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी 

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ‘निष्प्रभ’, वाचा नेमकं काय घडलं ? 

हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांना मोदींना घातला ‘जिरटोप’, शरद पवार गटाची जहरी टिका, म्हणाले.. “त्या बीभत्स माणसाच्या..”

हेही वाचा….भाजपच्या आमदारांनी ठाकरेंना घेरलं, भुजबळांनी ठाकरेंची बाजू घेत चांगलचं सुनावलं 

हेही वाचा..निवडणुकीनंतरही युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय,अजितदादांच्या विरोधात विधानसभेची तयारी ?