पुणे : पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला नियुक्त केले जाणार याची चर्चा सुरू होती. अखेर या पदी विजय देशमुख यांची वर्णी लागली असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचं बोलले जाते आहे.
या पदासाठी अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. अखेर विजय देशमुख यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी काल रात्री उशिरा पदभार स्विकारला. देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी देखील त्यांनी या पदावर काम पाहिले आहे. मात्र काही न्यायालयीन प्रक्रियमुळे त्यांना या पदावर राहता आले नव्हते. विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.