IMPIMP
Vijay Shivtare's warning to the army, who will expel me, I left the army Vijay Shivtare's warning to the army, who will expel me, I left the army

“माझी काय हकालपट्टी करणार, मीच सेनेतून बाहेर पडलो”; विजय शिवतारे

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा परिणाम शिवसेनेवर मोठा होत आहे. सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची पक्षातून हाकापट्टी करण्यात येत आहे. तर अनेक जण उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. यातच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र यावेळी त्यांनी सेनेला मोठा इशारा दिला आहे.

“अन्यथा..! या सरकारची दे माय, धरणी ठाय अशी अवस्था करू” 

29 जुन रोजी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच जायचं नाही. उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडावी सर्व काही ठिक होईल. एकनाथ शिंदे यांनी तेच सांगितलं होतं. मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. माझी काय हकालपट्टी करणार. मीच सेनेतून बाहेर पडलो होतो. असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

“एखादा चित्रपट निघू शकतो”; शिंदेंच्या वक्तव्यानंतर “मी पुन्हा येईन” ची आठवण 

राज्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीला 56 टक्के निधी, काॅंग्रेसला 26 टक्के निधी आणि आमचा मुख्यमंत्री असून केवळ आम्हाला 16 टक्के निधी होता. त्यामुळे विकास कामे कशी करायची. मतदारसंघाचा विचार करत नसाल आणि निधीतील असमानता दुर केली नाही तर आम्ही पर्याय शोधू हे आम्ही त्यांना दीड दोन महिन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी मतदारसंघाच्या दृष्टीने काही ना काही तरी निर्णय घेतला पाहिजे असा आम्ही ठराव केला होता. पुढच्या काळाता अनेक बडे शिवसेना पदाधिकारी शिंदे सोबत असतील. माझ्याही संपर्कात अनेक जण आहेत. माजी आमदारही त्यात आहे. असंही शिवतारे म्हणाले.

“तुम्हाला काळजी असती तर देशमुख तुरूंगात गेले नसते”; सुप्रिया सुळेंना भाजपने डिवचलं 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना आणि एकनाथ  शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सेनेतून अनेक जणांची हाकालपट्टी करण्यात आली आहे तर अनेक नगरसेवक, पदाधिकारी, आणि सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.

Read also