लोणावळा: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काल भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर आज लोणावळ्यात ओबीसींची परिषद भरलीय होती. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं. पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावाच वडेट्टीवारांनी केला. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वडेट्टीवारांना टोला लगावलाय.
समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं. ह्या नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी स्वत:च्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली.
वडेट्टीवारांचा दरेकरांना टोला
वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना वडेट्टीवारांनाही टोला लगावलाय. काँग्रेसनं ओबीसींवर सातत्याने अन्याय केला आहे. त्यामुळेच आज विजय वडेट्टीवार यांनी मनातील खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी २२ व्या क्रमांकाचं खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चांगला समन्वय असल्याच्या सांगणाऱ्या वडेट्टीवारांचं हे वक्तव्य पक्षांतर्गत धुसफूस दाखवणारं असल्याचा टोला दरेकर यांनी लगावलाय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, असं म्हणणाऱ्यांसाठी वडेट्टीवारांचं हे वक्तव्य एकप्रकारे चपराक असल्याची टीकाही दरेकरांनी केलीय.
वडेट्टीवारांची खदखद
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं. पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावाच वडेट्टीवारांनी केला.
मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहोत. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल, प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब… माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी. या बैठकीचा विचार ज्यावेळी पहिल्यांदा मांडला त्यादिवशी पासून मला रोज धमक्या येत आहेत. मला रोज १० धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. कोरोना लाट गेली, की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार. जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे. आमच्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.