राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चाना उधाण आले आहे. मात्र आता यावर पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पार्थ यांना वैयक्तिक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आजोबा सार्वजनिक ठिकाणी बोलल्यामुळे पार्थ हा नाराज झाला असेल मात्र तो विसरून देखील जाईल. पार्थ हा आमच्या घरातील सगळ्यात समजूतदार आहे’, असे विजया पाटील म्हणाल्या.
विजया पाटील म्हणाल्या “पार्थ पवार हा अतिशय समजूतदार आहे आणि सध्या जी काय परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी पवार कुटूंब सक्षम आहे. मुळात इतका विषय वाढवण्याचीच काही गरज नव्हती. पार्थ हा आता सगळे काका आणि आत्या यांच्याशी बोलणार आहे. अजून तरी पार्थ यांचा फोन आला नाही. पण तो सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलला. त्या तर पार्थची सगळ्या आवडती आत्या आहे. ज्या वेळी पार्थ या सगळ्या संदर्भात चर्चा करेल त्यावेळी योग्य तो सल्ला दिला जाणार”
“नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. यावरून अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. यातच काल पार्थ शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर गेले होते.
पार्थ पवार यांनी गेल्या पंधरा दिवसात घेतलेल्या भूमिकेमुले महाराष्ट्रात अनेक चर्चाना तोंड फुटलं आहे . त्यात आता पार्थ यांनी आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं . पवार साहेब यांनी सार्वजनिक ठिकाणी पार्थ बद्दल बोलल्यामुळं तो नाराज झाला आहे. पण तो लगेचच विसरुन देखील जाईल तसेच आजोबांना नातवाला रागावण्याच्या पूर्ण अधिकार आहे. सगळ्यांच्याच घरी वडिलधारी माणसे समजावत असतात. मात्र शरद पवारांना असे रागवताना पहिल्यांदाच पाहिल्याचं देखील यावेळी म्हणाल्या