आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील १४ मराठा संघटना एकत्रित येऊन “मराठा समन्वय समिती” स्थापन झालेली आहे. या समितीच्या वतीने “मराठा आरक्षण” व समाजाच्या इतर प्रश्नांबाबत, राज्यभरातील आमदार-खासदारांना निवेदने देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याप्रमाणेच मराठा समन्वय समिती, पुणे यांच्यावतीने उद्या गुरुवार पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.
तसेच सोमवार दि.१७ ऑगस्ट रोजी मराठा प्रश्नांवर झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी “जागरण गोंधळ” घालून पुणे स्वारगेट येथे आंदोलन करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. .
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. २५ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या सुनावणीच्या तारखा आहेत.आरक्षण टिकण्यात सरकारने थोडीही कुचराई केली तरी करोडो मराठा समाजाचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान होणार आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे.