IMPIMP
Vinod Tawde Vinod Tawde

विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन

मुंबई : काल नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी तब्बल ७२ मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, इत्यादी प्रमुख नेत्यांचा  समावेश आहे. यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील काल मंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दुसरा नेता निवडला जाणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

भाजप पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार एक पद एक व्यक्ती यानुसार जे.पी. नड्ड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त झालं आहे. यातच आता या पदासाठी महाराष्ट्रातील विनोद तावडे यांचं नाव सध्या चर्चेत आलं आहे. कारण या निवडणुकीसाठी विनोद तावडे यांनीच नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे भाजप आता राष्ट्रीय अध्यक्ष पद विनोद तावडे यांना देतील. अशी चर्चा आहे.

हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ? 

लोकसभा निवडणुकीच्या आधीच आणि त्यानंतर विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवली आहे. याचाच भाग म्हणून त्यांना आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याआधी या पदासाठी शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, अमित शाह यांच्या नावाची चर्चा होती. परंतु त्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर विनोदी तावडेच मोठे नेते राहिले आहेत.

READ ALSO :

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट 

हेही वाचा…राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान 

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान