मॉस्को : रशियन राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतिन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात.
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले आणि गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइला आणि पुतिन यांच्या दोन मुलींनी केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुतिन हे पार्किसन्स आजाराशी झुंजत असून, त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे दिसत आहेत.
हे नवे विधेयक स्वत: पुतीन यांनी सादर केले होते. या विधेयकानुसार पुतिन जिवंत असेपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईपासून सूट दिली जाईल. तसेच सरकारकडून त्यांना सर्व सवलती दिल्या जातील. रशियाची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या आरटीनुसार हे विधेयक म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाचे संकेत आहेत. पुतीन यांना पार्किंसन्स आजार असल्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आलेली नाही. दरम्यान, सोलोवेई यांनी सांगितले की, लवकरच एक नवा पंतप्रधान नियुक्त केला जाईल. त्याला पुतिन यांच्या संरक्षणाखाली प्रशिक्षित केले जाईल.