IMPIMP
We are born to farmers, used to getting wet in the rain We are born to farmers, used to getting wet in the rain

“आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, पावसात भिजायची सवय “

कोंढवा : आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय. पावसात भिजायची सवय आहे. कधी ऊन, वारा, पाऊस काम करत राहा याचं याच ध्येयाने आम्ही काम करत असतो, हा आमच्या बद्दलचा विश्वास लोकांना आहे. म्हणून लोक पावसातही प्रतिसाद देत आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा..“जनता महायुतीसोबत, भोसरीतून एक लाखांचं मताधिक्क देणार”, महेश लांडगेंची ग्वाही 

शिरूर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराची सांगता सभा होणार आहे. शुक्रवारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या हडपसर, कोंढवा भागातील रोड शोला भर पावसातही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे रोड शोमध्ये ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत केले.

हेही वाचा..“जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न”, राज ठाकरेंची विरोधकांवर टीका 

कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रज चौक, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक नगर, गोखलेनगर या परिसरातून हा रोड शो करण्यात आला. मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते दुचाकींवर तसेच चारचाकी वाहनांतून या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, ज्येष्ठ नेते जालिंदर कामटे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, नंदाताई लोणकर, संजय लोणकर, आरती बाबर, मनीषा कदम, वीरसिंग जगताप, वृषाली कामठे, अभिमन्यू भानगिरे, सतपाल पारधे, रोहन गायकवाड, सुप्रिया शिंदे, सुनील कामठे आदी यावेळी उपस्थित होते.

READ ALSO :

हेही वाचा…देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिला बारणेंना बिनशर्त पाठिंबा 

हेही वाचा…अॅडव्हान्टेज’ मोहोळ, आढळराव, बारणे, `महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल 

हेही वाचा…विरोधकांवर हल्लाबोल,…! पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढला फतवा, म्हणाले…. 

हेही वाचा…“परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’”, मोहोळांसाठी प्रवीण तरडेंचं दमदार भाषण 

हेही वाचा…“कोल्हे महागद्दार, ते आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवताहेत”, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल