IMPIMP
We will also take his word, have some patience", Patel's statement after not getting a cabinet ministe We will also take his word, have some patience", Patel's statement after not getting a cabinet ministe

“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान

मुंबई : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यातच राज्यातून भाजपच्या नऊ जागा जिंकून आल्या आहेत. यातील काही खासदारांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर आज पंतप्रधान कार्यालयाकडून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे तसेच पुण्यातील पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना फोन आला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद निश्चित झालं अशी माहिती आहे. यातच केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्री न मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ? 

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाला डावलण्यात किंवा कमी लेखण्याचं काही कारण नाही. खासदारांची संख्या घटली किंवा वाढली असा कुठलाही विषय नाही. शिवसेना आणि आमच्या संख्याबळात खूप अंतर आहे. दोन्ही पक्षाला एकच ऑफर केली. याचा अर्थ हे पण समजू नका की, त्यांच्या मनात काही भेदभाव आहे. त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं आहे. हे घ्या नाही तर काहीच नको घ्या, असंही ते म्हणाले नाहीत. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या शब्दावर, थोडे दिवस धीर ठेवू. असेही ते म्हणाले.

हेही वाचा..महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अन् भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा

आज एकमेकांची सर्वांना गरज आहे. महाराष्ट्रात उद्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीत आम्हा सर्वांना सामोरं जायचं आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की, काही ना काही योग्य निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येईल. आम्हाला भाजप पक्षश्रेष्ठींकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी पुर्वी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेलो आहे. म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्यात भाजप पक्षश्रेष्ठींची काही चूक आहे, किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत. कारण कसं आहे की, त्यांना राजीकय पक्षांना सोबत घेऊन काम करायचं असतं. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ? 

हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं 

हेही वाचा..पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, आज मंत्रीपदाची शपथ घेणार ? 

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त