IMPIMP
rahul gandhi vs narendra modi rahul gandhi vs narendra modi

“गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, थेट संसदेत राहुल गांधींनी मोदींना दिलं चॅलेंज”

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतांंना आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दमदार भाषण केलं. यावेळी राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांवर जोरदार घणाघात चढवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात एकदम उदास असल्याचे दिसून आलेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे देखील एकही शब्द न बोलतांना दिसले. याच वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मोठं आवाहन दिलं आहे.

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी गुजरामधील कापड व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की, अब्जाधीशांच्या मदतीसाठी नोटाबंदी आणि जीएसटी आणले होते. नरेंद्र मोदी हे अब्जाधीशांसाठी काम करतात. मात्र, गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. लिहून घ्या. गुजरातमध्ये इंडिया आघाडी एनडीएचा पराभव करणार. असा इशारा देखील त्यांनी दिला.

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, मागच्या दहा वर्षात लोकांना घाबरवणं, तुरूंगात टाकणं हे प्रकार सर्रास सुरू होते. जे लोक भाजपच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात ठरवून कारवाया झाल्या. मीडियाचा वापर करून मलाही नावं ठेवण्यात आली. माझ्यासाठी गमंतीशीर भाग होता तो म्हणजे ५५ तासांची ईडी चौकशी. कारण ती चौकशी संपल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कॅमेरा बंद करा आणि मला म्हणाला राहुल गांधी तुम्ही एखाद्या दगडासारखे इथे ५५ तास बसून आहात. अशा प्रकारचा राजकीय हल्ला केला जातो. तेव्हा स्थितप्रज्ञ असावं लागतं. असेही राहुल गांधी म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..पंकजा मुंडेंचं भाजपकडून अखेर झालं राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेवर मिळाली संधी 

हेही वाचा…“विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर..! ‘या’ पाच जणांना मिळाली भाजपकडून संधी 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

Leave a Reply