पार्थ पवार भाजपमध्ये येणार असले, तरी आम्ही घेणार नाही’, असे वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल पार्थ पवार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पार्थ पवार यांच्या या नाराजीबाबत आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.
पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार जाहीरपणे म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्याचे पडसाद पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीमध्येही उमटले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवारांनी पवार कुटुंबातल्या व्यक्तींच्या भेटीगाठीही घेतल्या. ‘पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात गिरीश बापट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जय श्रीराम फक्त पार्थ नाही, तर संपूर्ण जग म्हणतं, असेही गिरीश बापट म्हणाले आहेत.
दरम्यान शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार सकाळी मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाहून पुण्याला आले होते. त्यानंतर बारामतीत पवार कुटुंबाची एकत्रित चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र संभाव्य दौरा रद्द करत संध्याकाळी पवार दाम्पत्य पुण्याहून पुन्हा मुंबईला परतले.