पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करतीत मुंबईत येत नाही ना ? तिघाडीच्या भांडणात ही फाईल अडकली तर नाही ना ? असे सवाल करत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोनामुळे मंदावलेला रिअल इस्टेट मार्केटला दिलासा राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला असला तरी रेडी रेकनरचे दर अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.
आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. “निधीसाठी रोज केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. चला चांगले आहे. पण रेडी रेकनरच्या दरांचे काय ? ते का घोषित करत नाही ?’, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
निधीसाठी रोज केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.
चला चांगले आहे!
पण…
रेडी रेकनरच्या दरांचे काय?
ते का घोषित करत नाही?
(1/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 27, 2020
याचबरोबर, “रेडी रेकनरचे दर मार्चमध्ये कोरोनामुळे जाहीर झाले नाहीत. मे पर्यंत मुदतवाढ दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक, पुणे यांच्याकडे मे मध्ये ही फाईल तयार झाली. पण…ती आँगस्ट संपला तरी मंत्रालयापर्यंत का पोहचलीच नाही ? पुणे ते मुंबई या प्रवासाला तीन महिने का लागतात?”, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
रेडी रेकनरचे दर मार्च मध्ये कोरोनामुळे जाहीर झाले नाहीत… मे पर्यंत मुदतवाढ दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक, पुणे यांच्याकडे मे मध्ये ही फाईल तयार झाली..
पण…ती आँगस्ट संपला तरी मंत्रालयापर्यंत का पोहचलीच नाही?
पुणे ते मुंबई या प्रवासाला तीन महिने का लागतात?
(2/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 27, 2020
पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून "टोल" गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना?
तिघाडीच्या भांडणात अडकली नाही ना?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी “पदयात्रा” करुन "लक्ष्मीदर्शन" तर करीत नाही ना?
फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? (3/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 27, 2020