IMPIMP
What else do you expect from those ticking clocks said murlidhar mohol What else do you expect from those ticking clocks said murlidhar mohol

घड्याळाच्या काट्यावर टिक टिक करणाऱ्या प्रवक्त्यांकडून अजुन काय अपेक्षा?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला स्थगिती दिली. यावरून शिंदे फडणवीस सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे,  यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर घड्याळाच्या काट्यावर टिक टिक करणाऱ्या प्रवक्त्यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय असेल? अशी टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार राऊत यांच्यावर केली आहे.

“सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची”; करकपातीवरून भुजबळांची सरकारवर टिका 

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव अशी नामांतराची घोषणा केली. काही दिवसातच महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडानंतर पडले. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनी भाजपसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकरने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धारशिव या शहराच्या नामांतराला स्थगिती दिली. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

“त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता”; केसरकरांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर 

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासुन झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रिम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

आमच्या जीवावर येत असेल, तर…; सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरें आक्रमक 

महाविकास आघाडीच्या 5 निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यातच औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील हे नाव दिल्याच्या निर्णयावर शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.  गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना आणि एकनाथ  शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सेनेतून अनेक जणांची हाकालपट्टी करण्यात आली आहे तर अनेक नगरसेवक, पदाधिकारी, आणि सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.

Read also