IMPIMP
What happened in the two-hour marathon meeting? The minister will meet the hunger strikers today What happened in the two-hour marathon meeting? The minister will meet the hunger strikers today

दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले ? उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार

मुंबई : ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतानाच, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारने शुक्रवारी बोलवण्यात आलेल्या ओबीसींच्या बैठकीत मांडली. तसेच राज्यात ज्या ५४ लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटल्या आहेत. त्याबाबत देखील फेरविचार केला जाईल. असं बैठकीत सांगण्यात आलं.

हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ? 

जरांगे पाटलांनी उपोषण पुकारल्यानंतर राज्यात आता ओबीसी आरक्षण बचावसाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण सुरू केले आहे. याच मुद्दावर चर्चा करण्यासाठी काल सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत खोटी ओबीसी प्रमाणपत्रे कुणालाही दिली जाणार नाहीत. ती दिली असतील तर तपासली जातील. तसेच खोटी प्रमाणपक्षे घेणे देणे गुन्हा आहे. अशी प्रमाणपत्रे घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई होईल. असं ठरवण्यात आलं.

तसेच मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देणार नाही, ते कायद्यातही बसत नाही. काही लोक ओबीसी, ईसीबीसी, ईडब्लूएस अशी वेगवेगळी प्रमाणपत्रे काढून वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेतात. त्यामुळे दाखले आधार कार्डला जोडण्याची कल्पना बैठकीत मांडण्यात आली, ती सरकारने स्वीकारली असून त्यामुळे एकाच दाखल्याचा फायदा घेतला जाईल व सरकारला फसवले जाणार नाही.

हेही वाचा..हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री गावात, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया… म्हणाले… 

मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जशी मंत्रिमंडळ उपसमिती आहे, तशी उपसमिती ओबीसी, भटक्या-विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केली जाईल. सगेसोयऱ्याच्या बाबतीत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. एससी, एसटी, ओबीसींमध्ये सगेसोयरेंना दाखले देण्याबाबत सविस्तर नियमावली आहे, तशी नियमावली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सगेसोयरेबाबत प्रश्न सोडवणार तसेच मराठा ओबीसी समाजावर अन्याय करणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यातच पुणे आणि वडीगोद्रीला शनिवारी काही मंत्री जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेणार आणि उपोषण मागे घेण्याची सरकार विनंती करणार असल्याची चर्चा यावेळी बैठकीत झाली.

READ ALSO :

हेही वाचा..खेडमधून अतुल देशमुखांची उमेदवारी निश्चित; ‘मविआ’च्या मुंगसे, काळे यांचा पत्ता कट!

हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा 

हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश 

हेही वाचा..“भाजपच्या सर्व्हेमुळे आमचा खेळ झाला”, महायुतीतील बड्या नेत्याचा आरोप, महायुतीत राजकीय युद्ध 

हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय 

Leave a Reply