IMPIMP
devendra fadnavis uddhav thackeray devendra fadnavis uddhav thackeray

लिप्टमध्ये ठाकरे अन् फडणवीसांची काय चर्चा झाली ? प्रत्यक्षदर्शी भुजबळांनी सांगितली खरी हकिकत

मुंबई : राज्य सरकारच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. तर उद्या राज्याचं अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे. त्याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात एकाच लिप्टमधून प्रवास केल्याने त्याची एकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

हेही वाचा..मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी निवडणुक लढणार, विधानसभेसाठी मेगा प्लॅन ठरला 

पावसाळी अधिवेशनासाठी सर्वपक्षीय नेते आमदार विधीमंडळात दाखल झाले होते. याचवेळी उद्धव ठाकरे हे देखील अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिप्टमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर प्रवीण दरेकर, छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरही लिप्टमध्ये होते.

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. लिप्टमधून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, आही सर्वजण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेलो. लिप्टमध्ये जाणं आणि बाहेर पडण्यात वेळ गेला. त्यामध्ये किती भेटणार, किती बोलणार ? लिप्टमध्ये सर्वांनी हस्तांदोलन केलं. कसे आहात वगैरे विचारलं. नेहमीप्रमाणे एखादा ओळखीचा नेता भेटल्यावर करतात ते सोपस्कार केले.

READ ALSO :

हेही वाचा..टायगर अभी जिंदा है..! चंद्रपुर जिल्ह्यात बडे नेते लागले विधानसभेच्या तयारीला

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

हेही वाचा…राहुल गांधींनाही पंढरपुरच्या विठ्ठलाची ओढ, वारकऱ्यांसोबत दिंडीत पायी चालणार ? 

हेही वाचा…महाविकास आघाडीत कॉंग्रेसचच मोठा भाऊ, विधानसभेत कॉंग्रेस १०० जागा लढवणार ? इतरांना किती ? 

हेही वाचा…“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंनी डिवचलं 

Leave a Reply