IMPIMP
What was the need to take Ajit Pawar with him, the BJP did not have confidence, the Sangh showed a mirror to the BJP What was the need to take Ajit Pawar with him, the BJP did not have confidence, the Sangh showed a mirror to the BJP

“अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती,”? भाजपला आत्मविश्वास नडला, संघाने भाजपला दाखवला आरसा

मुंबई : 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभेत केवळ २४० जागा जिंकता आल्या. याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वासमुळे अशी टिका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला असून राज्यात आता विरोधकांकडून भाजपवर जोरदार टिका केली जात आहे.

हेही वाचा..“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

अनेक वर्ष कॉंग्रेसच्या ज्या विचारधारेच्या विरोधात लढाई केली. सत्तेसाठी आज त्याच कॉंग्रेसमधील लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले. यामुळे कार्यकर्ता दु: खी झाला. २६/११ ला संघाचा कट म्हणणारे कॉंग्रेस नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले. यामुळे संघाच्या स्वंयसेवकांना मोठा धक्का बसला. निष्कारण राजकारण करत बसल्याचे महाराष्ट्र उदाहरण आहे. शरद पवार घराणातील भांडणे सोडवण्यात व्यक्त राहिले असते. अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती. आयोगा तो मोदी, चारसो पार, हा अतिआत्मविश्वास ? जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं का ? असे अनेक सवाल यात करण्यात आले.

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला 

तसेच लोकसभा निवडणुका, त्यासाठी सर्वच पक्षांकडून झालेला कडवा प्रचार आणि त्यानंतर आलेल्या निकालबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का ? संघाचा कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप, कॉंग्रेससह सर्वच पक्षांना कानपिचक्या दिल्याच. शिवाय न घेता भाजपच्या केंद्रीय धुरिणांची ही कथीत मी पणा बद्दल कान उघाडणी केली. त्यामुळे भाजप आणि संघ कोणत्या दिशेने जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अजितदादांसोबत जाऊन भाजपने  ब्रँड_व्हॅल्यू गमावल्याची टीका ऑर्गनायझर मधून केल्याचं वाचनात आलं.  केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती पण भाजपची ब्रँड_व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली. भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव आहे आणि ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो हे आज खरं होताना दिसत आहे… वापरायचं_आणि_फेकून_द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..“सत्ता डोक्यात गेली अन् पाय जमीनीवर राहिले नाही तर..”, शरद पवारांनी दिला कडक इशारा 

हेही वाचा…विधानसभेच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना 

हेही वाचा..महायुतीत धाकधुक वाढली..! भाजप विधानसभेला एकटंच लढणार?

हेही वाचा..“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पं नाही”, राष्ट्रवादीतील अंतर्गत शितयुद्ध चव्हाट्यावर

हेही वाचा..शपथविधी झाला, खातेवाटपही झालं, आता पहिलं अधिवेशन २४ जूनपासून.. वादळी ठरणार ?