IMPIMP
When announcing the date of Sannyasa, the Shelars reminded me of the old days When announcing the date of Sannyasa, the Shelars reminded me of the old days

“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण ३० जागा जिंकत महायुतीवर मागच्या निवडणुकीपेक्षा वरचढ ठरली आहे. काल लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील सगळेच चित्र स्पष्ट झाले आहे. अशातच आता महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा..पुणे कार अपघाताची पुनरावृत्ती, शिरूरमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एकाला चिरडलं 

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एक दावा केला होता. राज्यात महाविकास आघाडीच्या १८ जागा जिंकून आल्या तर राजकीय संन्यास घेईन असं आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. त्यावर आता राज्यात महाविकास आघाडीच्या ४८ जागांपैकी तब्बल ३० जागा जिंकून आल्या आहेत. त्यावरून सुषमा अंधारे यांनी शेलारांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा…२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किती जागा येतील? Exit Poll च्या आधी प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी 

सुषमा अंधारे म्हणाल्या की,आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना. म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी, कफनी, रूद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी शेलारांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर आता शेलारांची यावर काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला तब्बल २९ जागा आल्या आहेत. तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले असून ते महाविकास आघाडीसोबत आहेत. तर यात महायुतीला फक्त १६ जागा जिंकता आल्या आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट 

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार 

हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला सर्वात जास्त जागा, अजित पवार गटाला भोपळा ? एक्झिट पोल समोर 

हेही वाचा..पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर 

हेही वाचा…इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा