IMPIMP

भाजपला बाबासाहेबांचा इतका कळवळा कधी आला? तर आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत दाखवणार का?


पुणे : मनुस्मृतीचं दहन करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनवधानाने फाडला. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी देखील मागितली. तरी देखील संपूर्ण राज्यात आज जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू भक्कम पणे मांडली आहे. यावरूनच पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, ज्यांच्या नसानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तत्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केलं. पण पोर्शे कार अपघातात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन केलं जातंय. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का?अस आव्हान देखील रोहित पवारांनी दिलं आहे.

दरम्यान, “भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का?” रोहित यांनी हे वापरलेलं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे.मी पुन्हा एकदा सांगतो,माझ्या कडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागितली आहे.पण भाजपा आणि इतर विरोधकांनी यामागे लपून आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये. असेल हिम्मत तर या समोर..आणि करा राज्यभर मनुस्मृतीचे दहन. असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.